पृष्ठे

पृष्ठे

रविवार, ७ जुलै, २०१९

निसर्गाची करामत.....



लिंबाच्या बिया मिळण्याचे ठिकाण म्हणजे बाभळीच्या झाडाखाली. बाभळीच्या झाडावर पक्षी बसतात आणि पक्षी विविध झाडांचे फळ खातात त्यांच्या बिया विष्ठेद्वारे झाडाखाली पडतात. यात जसे लिंब , पिठूनी , चमेली.मग   परिसरातील बाभळीच्या झाडाचा शोध घ्या आणि सापडलेल्या लिंबाच्या बिया माती आड करा. लिंबाच्या बिया शक्यतो पिठुनीच्या , किंवा इतर  झुडपा शेजारी लावा .कारण लिंबाच्या झाडाचे शेंडे बकरी खाते. झुडपात लिंबाच्या बिया लावल्याने काट्यामध्ये बकरीचे तोंड जात नाही व झाडाचे ही संरक्षण होते.. बिया लावतांना काळजी घ्या .बियांवर फक्त बोटाइतकीच माती टाका किंवा बी च्या जाडी इतकीच माती बी वर  टाका.......झाडे लावा झाडे जगवा

🍀🍀🍀🍀🍀🌳🌳🌳🌳🌳🍀🍀🍀🍀





हे कनसराचे झाड ....याझाडावरही पक्षी बसतात आणि पक्षी विविध झाडांचे फळ खातात त्यांच्या बिया विष्ठेद्वारे झाडाखाली पडतात.  याझाडाखाली अनेक झाडं उगवली आहेत. यात लिंब , कणसर  , पिठुनी , चमेली....
🌳🌳🌳🌳🌳

उगवलेले झाडं










कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा