.........पळस.............
याझाडाचे वन निर्मित मोठे योगदान आहे. याझाडाला पॅरट ट्री ही म्हणतात.पळसाचे झाड डोंगराळ , मुरमाड जमीनीत सुध्दा जोमाने वाढते. पळसाला फेब्रुवारी, मार्च मध्ये फुलं येतात. पळसाला शक्यतो जळण किंवा इतर कामासाठी कोणी तोडत नाही . ग्रामीण भागात छप्पर करण्यासाठी पळसाची पाने वापरतात.तसेच पुर्वी जेवणासाठी पत्रवळी , द्रोण तयार केली जायचे यामुळे ग्रामीण भागात रोजगार निर्माण होत असे. पोळ्याला बैलांना सजवण्यासाठी शिंगाना बांधण्यासाठी चौराचे गोंडे बनविले जातात . हा चौर पळसाच्या मुळ्यांपासुन तयार केला जातो. विदर्भात आजही मोठ्या प्रमाणात पळसाचे जंगल आहे. विदर्भात आजही कुरडई , खारुडी टाकण्यासाठी ( वाळवण) पळसाचे पाने वापरली जातात .. आम्ही लहानपणी रंगपंचमीला पळसाच्या फुलांचा रंग तयार करुन वापरत असु. पळसाचे झाड फुलांमुळे व गर्द हिरव्या पानामुळे जंगलाची शोभा वाढवते. तसेच सावलीही दाट असते. जनावरे पळसाचे पाने खात नाही.तसेच कमी पाण्यात ही वाढते यामुळे वन निर्मितीत पळस बहुमोल आहे. पळसापासुन कोणता त्रास नाही.आम्ही लहानपणी पावसाळ्यात जनावरे चारण्यासाठी डोंगरावर जात असे त्यावेळी पाणी पिण्यासाठी पळसाच्या पानांचा कोन करुन पाणी पित असे. तसेच डोंगरावर पावसापासुन वाचण्यासाठी एखाद्या पिठुनीच्या झुडपावर पाळसाचे पाने टाकुन पावसाळ्यापुरता झोपडीसारखे छप्पर करत असत..पळसाच्या झाडावर सकाळी सकाळी अनेक पक्षांची मोठी किलबिलाट असते. सकाळी वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी पळसाच्या झाडावर पाहण्यास मिळतात. यात प्रामुख्याने पोपट ... पक्षी निरीक्षणासाठी ही एक सुवर्णसंधीच आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा