पृष्ठे

पृष्ठे

शुक्रवार, १६ ऑगस्ट, २०१९

एक तप निसर्गाच्या सेवेचे.......


 वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाची एक तपपुर्ती


🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳


 सन 2007  मध्ये सुरू केलेली

 वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाची चळवळ आज
एक समाधानाची तपपुर्ती पुर्ण झाली ..
सुरुवातीला झाडं लावली. जेष्ठ नागरीक संघ , पत्रकार संघ  , पोलिस विभाग  , महसूल विभाग , सामाजिक वनीकरण विभाग , ग्रामस्थ   अशा अनेक हातांच्या सहकार्याने याकार्याची वाटचाल सुरू आहे. सुरूवात वृक्षारोपण करून झाली पण जसे पुढे जात असतांना आपण लावलेल्या झाडांचे संवर्धन करण्याबरोबर जे निसर्गातील विविध घटकांच्या मध्यमातुन बीजरोपण होऊन जे झाडं उगवलेले आहेत त्यांचे ही संवर्धन करु लागलो.  वृक्षसंवर्धन करतांना अनेक क्लृप्त्या सुचल्या झाडं जगवायची कशी यातुनच मग झाडांना भर लावण्यासाठी परिसरातील गवत , झाडांचा पालापाचोळा,  काटक्या  , दगड , गोण्या,  मातीचा उपयोग करुन वृक्षसंवर्धन करु शकलो.गंगाधरी,  ग्रामीण रुग्णालय नांदगाव ,   बस डेपो , शाळा आदी ठिकाणी वृक्षारोपण केले.  पुढे वृक्षारोपणाबरोबर , बीज रोपण , वृक्ष भेट  , बिया वाटप ,शेतकरी बांधवांच्या बांधावर वृक्ष लागवड  सुरू केले. आणि आज गंगाधरी गावाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात हिरवळ निर्माण झाली आहे. वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाची चळवळ लोकां मध्ये रुजावी म्हणून वनदिन साजरा करणे , पर्यावरण दिन , चिमणी दिन,   चित्रकला स्पर्धा ,  चित्र रंग भरा स्पर्धा , निबंध स्पर्धा,  वक्तृत्व स्पर्धा ,  वृक्ष दिंडी , धार्मिक कार्यक्रम व लग्न समारंभात जनजागृती केली , झाडे लावा झाडे जगवा स्पर्धा  आदी उपक्रम राबविण्यात आले. यामुळे गंगाधरी गावातील लोकांमध्ये जनजागृती होऊन वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचे महत्व वाढले आहे. आता आम्ही रोपं कमी प्रमाणात लावतो त्याऐवजी मोठ्या प्रमाणात बीज रोपण करतो.तसेच परिसरातील नागरिकांना बियांचे वाटप केले जाते.यामुळे लोकांचे सहकार्य मोठ्या प्रमाणात मिळते. याकार्यात मला माझे आई वडील  आणि पत्नी , मुलगी , कुटुंबातील सदस्य , गंगाधरीचे ग्रामस्थ,  व विद्यार्थी मित्र  , तरुण मित्र , जेष्ठ ग्रामस्थ  , निसर्ग प्रेमी मित्र  आदींचे सहकार्य मिळते. पावसाळ्यात आम्ही वृक्षारोपण,  बीजरोपण करतो तर हिवाळ्यात व उन्हाळ्यात याझाडांना भर लावणे , ज्या झाडांना पाणी टाकण्याची गरज आहे त्यांना पाणी टाकतो. उन्हाळ्यात बिया गोळा करतो. तसेच झाडे जगवा अभियानात परिसरातील झाडांना भर लावतो.काही झाडांना काटेरी कुंपण ही करतो.  यावर्षी मोठ्या प्रमाणात आम्ही बिया लावल्या व वाटप करत आहोत............

.....झाडं लावा झाडे जगवा .....


......हेची माझी आस जन्मोजन्मी

                       निसर्गाचा राहू दे दास.....

आपण ही याकार्यात योगदान द्यावे ही विनंती....


🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳



    गोरख जाधव

         गंगाधरी
    ता. नांदगाव जि. नाशिक


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा