.......गौऱ्यांचा करुड....
ग्रामीण भागात ज्यांच्या कडे जनावरे जास्त असेल त्यांच्या कडे मोठ्या प्रमाणात शेण उपलब्ध असते.याशेणाचे एकतर शेणखत करतात.किंवा गौऱ्या थापतात.यागौऱ्यांना शहरात काही प्रमाणात मागणी असते.ग्रामीण भागातुन शहरात याची विक्री केली जाते.तसेच ग्रामीण भागात इंधन म्हणून गौऱ्या मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात .चूल पेटविण्यासाठी गौऱ्यांंचे तुकडे करून प्रथम चुलीत टाकले जातात. गौऱ्यांंचा अजुन ही ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वापर स्वयंपाक तयार करण्यासाठी होतो. गौऱ्यांंच्या विस्तवावर भाजलेली भाकर फार रुचकर असते.काही ग्रामस्थांना अजुनही चुलीवरचा स्वयंपाक फार आवडतो. उन्हाळ्यात गौऱ्या तयार करुन असा करुड केला जातो व पावसाळ्यात चुलीसाठी वापर केला जातो. ग्रामीण भागात मुली , महिला गौऱ्या तयार करण्याचे काम करतात. गौऱ्या टाकण्यासाठी काड , चारा कुट्टी , गवंडा (गव्हाचे भुस) वापरतात. मोठ्या प्रमाणात गौऱ्या तयार झाल्यावर गौऱ्यांंचा असा करुड करुन शेणाने वरुन सारविले जाते.करुड वरुन झाकण्यासाठी पाचट किंवा प्लॅस्टिकच्या कागदाचा वापर करतात.पुर्वी दगडाचा ओटा करुन त्यावर करुड रचला जायचा.आता काळाबरोबर बदल होत अशी घडवशी तयार करुन त्यावर करुड रचला जातो. आमच्या लहानपणी
पावसाळ्यात पावसाची झडगण सुरू होण्याचा अंदाज घेऊन आई , आजी काही गौऱ्या घरात आणुन ठेवत असत. आपल्या धार्मिक कार्यात गौऱ्यांंचा वापर केला जातो. पुर्वी रानशीणी गौऱ्यांवर रोडगे भाजले जायचे. वांग्याचे भरीत करण्यासाठी
यागौऱ्यांंचा विस्तव (आहार) करुन त्यावर वांगे भाजले जायचे. आजही ग्रामीण भागात काळ्या मसाल्याची भाजी करायची असेल तर चुलीत कांदे टाकले जातात.व नंतर ते कांदे काढुन पाट्यावर वाटुन भाजी केली जाते. ग्रामीण भागात हातपाय दुखःत असेल तर घरात घमेल्यात गौऱ्यांची शेकोटी करुन हातपाय शेकविले जातात. एकुणच ग्रामीण जीवनात गौरीचे महत्व फार मोठे आहे. होळीसाठी बालगोपाळ मंडळी गौऱ्या गोळा करतात.एखाद्याने गौऱ्या देण्यास नकार दिला तर रात्री त्याच्या गौऱ्या पळविल्या जातात.

9421509204
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा