पृष्ठे

पृष्ठे

बुधवार, ११ डिसेंबर, २०२४

आजचा दिवस माझा



हे पुस्तक वाचतांना 




आपण भारावून जातो.आणि आपण ही स्पर्धा परीक्षेची तयार करावी असे मनोमन वाटुन जाते. एक शिक्षक ते जिल्हाधिकारी असा संघर्षमय प्रवास श्री.विजय कुलांगे (IAS) सर यांचा झाला. अगदी सामान्य कुटुंबात जन्म घेऊन हलाखीची परिस्थिती असतांना केवळ जिद्द  व चिकाटीच्या बळावर मोठे  यश मिळवून समाजात आदर्श निर्माण करणारे पूर्वाश्रमीचे शिक्षक असलेले कुलांगे सर यांचे आत्मकथन आपण सर्वांनी नक्की वाचावे .यातून नक्कीच नवी उर्जा आपल्याला मिळेल. आणि नवनिर्मिती घडविण्यास प्रेरणा मिळेल.... 

सरांचे यश इतरांना नक्कीच प्रेरणादायी आहे.... ....

गोरख जाधव गंगाधरी 

आजचा दिवस माझा




Wednesday, December 11, 2024

आजचा दिवस माझा

 


हे पुस्तक वाचतांना 


आपण भारावून जातो.आणि आपण ही स्पर्धा परीक्षेची तयार करावी असे मनोमन वाटुन जाते. एक शिक्षक ते जिल्हाधिकारी असा संघर्षमय प्रवास श्री.विजय कुलांगे (IAS) सर यांचा झाला. अगदी सामान्य कुटुंबात जन्म घेऊन हलाखीची परिस्थिती असतांना केवळ जिद्द  व चिकाटीच्या बळावर मोठे  यश मिळवून समाजात आदर्श निर्माण करणारे पूर्वाश्रमीचे शिक्षक असलेले कुलांगे सर यांचे आत्मकथन आपण सर्वांनी नक्की वाचावे .यातून नक्कीच नवी उर्जा आपल्याला मिळेल. आणि नवनिर्मिती घडविण्यास प्रेरणा मिळेल.... 

सरांचे यश इतरांना नक्कीच प्रेरणादायी आहे.... ....

गोरख जाधव गंगाधरी 

No comments:

 

गुरुवार, २१ मार्च, २०२४

जागतिक वन दिन


 दृष्टिआड असलेल्या सृष्टी चे महत्त्व मानवाला समजण्याचे हे अगदी उघड उदाहरण म्हणता येईल .शुध्द हवा पिण्याचे पाणी आपल्याला मिळते त्या जंगलामुळेच .मात्र चंगळवादी  जीवनशैलीसाठी केल्या जाणाऱ्या बेसुमार जंगलतोडीमुळे निसर्गाचा समतोल ढासळत असल्याचे  १९७० च्या दशकात जाणवू लागले . त्यातुन जंगल वाचविण्याची संकल्पना पुढे आली . 

  


शनिवार, १४ ऑक्टोबर, २०२३

वाचनीय पुस्तके

 

🍁⭐🍁⭐🍁⭐🍁⭐🍁
*====================*
*🌺वाचावीत अशी १०० पुस्तके🌺*
     📚✍🏻📕📗🗞📖🗃

*०१) ययाती* = वि. स. खांडेकर
*०२) वळीव* = शंकर पाटील
*०३) एक होता कार्वर* = वीणा गवाणकर
*०४) शिक्षण* = जे. कृष्णमूर्ती
*०५) अस्पृश्यांचा मुक्तीसंग्राम* = शंकरराव खरात
*०६) यक्षप्रश्न* = शिवाजीराव भोसले
*०७) बनगरवाडी* = व्यंकटेश माडगुळकर
*०८) तीन मुले* = साने गुरुजी
*०९) तो मी नव्हेच* = प्र. के. अत्रे.
*१०) आय डेअर* = किरण बेदी
*११) व्यक्तिमत्त्व संजीवनी* = डॉ. वाय. के.शिंदे
*१२) मृत्युंजय* = शिवाजी सावंत
*१३) फकिरा* = अण्णाभाऊ साठे
*१४) राजा शिवछत्रपती* = बाबासाहेब पुरंदरे
*१५) बुद्धीमापन कसोटी* = वा. ना. दांडेकर
*१६) पूर्व आणि पश्चिम* = स्वामी विवेकानंद
*१७) वेदांताचे स्वरूप आणि प्रभाव* = स्वामी विवेकानंद
*१८) ....
*१९) आरोग्य योग* = डॉ. बी.के.एस. अय्यंगार
*२०) अंधश्रधा* : प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम = डॉ. नरेंद्र दाभोळकर
*२१) लोकमान्य टिळक* = ग. प्र. प्रधान
*२२) राजयोग* = स्वामी विवेकानंद
*२३) तरुणांना आवाहन* = स्वामी विवेकानंद
*२४) सत्याचे प्रयोग* = मो. क. गांधी
*२५) योगासने* = व. ग. देवकुळे
*२६) १८५७ ची संग्राम गाथा* = वि.स.वाळिंबे
*२७) कर्मयोग* = स्वामी विवेकानंद
*२८) गाथा आरोग्याची* = डॉ. विवेक शास्त्री
*२९) रणांगण* = विश्राम बेडेकर
*३०) बटाट्याची चाळ* = पु.ल.देशपांडे
*३१) श्यामची आई* = साने गुरुजी
*३२) माझे विद्यापीठ ( कविता )* = नारायण सुर्वे
*३३) १०१ सायन्स गेम्स* = आयवर युशिएल
*३४) व्यक्ति आणि वल्ली* = पु.ल.देशपांडे
*३५) माणदेशी माणसं* = व्यंकटेश माडगुळकर
*३६) उचल्या* = लक्ष्मण गायकवाड
*३७) अमृतवेल* = वि.स.खांडेकर
*३८) नटसम्राट* = वि.वा.शिरवाडकर
*३९) हिरवा चाफा* = वि.स.खांडेकर
*४०) क्रोंचवध* = वि.स.खांडेकर
*४१) झोंबी* = आनंद यादव
*४२) इल्लम* = शंकर पाटील
*४३) ऊन* = शंकर पाटील
*४४) झाडाझडती* = विश्वास पाटील
*४५) नाझी भस्मासुराचा उदयास्त* = वि.ग. कानिटकर
*४६) बाबा आमटे* = ग.भ.बापट
*४७) डॉ. बाबासाहेब आंबेडकर* = शंकरराव खरात
*४८) एक माणूस एक दिवस भाग १* = ह.मो.मराठे
*४९) एक माणूस एक दिवस भाग २* = ह.मो.मराठे
*५०) एक माणूस एक दिवस भाग ३* = ह.मो.मराठे
*५१) आई* = मोकझिम गार्की
*५२) स्वभाव , विभाव* = आनंद नाडकर्णी
*५३) बलुत* = दया पवार
*५४) कर्ण , खरा कोण होता* = दाजी पणशीकर
*५५) स्वामी* = रणजीत देसाई
*५६) वपुर्झा ( भाग १-२ )* = व. पु. काळे
*५७) पांगिरा* = विश्वास पाटील
*५८) पानिपत* = विश्वास पाटील
*५९) युंगंधर* = शिवाजी सावंत
*६०) छावा* = शिवाजी सावंत
*६१) श्रीमान योगी* = रणजीत देसाई
*६२) जागर खंड – १* = प्रा. शिवाजीराव भोसले
*६३) जागर खंड – २* = प्रा. शिवाजीराव भोसले
*६४) चंगीजखान* = उषा परांडे
*६५) आर्य चाणक्य* = जनार्धन ओक
*६६) भारताचा शोध* = पंडित जवाहरलाल नेहरू
*६७) गोष्टी माणसांच्या* = सुधा मूर्ती
*६८) वाईज अंड आदर वाईज*
*६९) उपेक्षितांचे अंतरंग* = श्रीपाद महादेव माटे
*७०) माणुसकीचा गहिवर* = श्रीपाद महादेव माटे
*७१) यश तुमच्या हातात* = शिव खेरा
*७२) आमचा बाप अन आम्ही* = डॉ. नरेंद्र जाधव
*७३) कोसला* = भालचंद्र नेमाडे
*७४) बखर : एका राजाची* = त्र्यं. वि. सरदेशमुख
*७५) मनोविकारांचा मागोवा* = डॉ. श्रीकांत जोशी
*७६) नापास मुलांची गोष्ट* = संपा. अरुण शेवते
*७७) एका कोळियाने* = अन्रेस्ट हेमींग्वे
*७८) महानायक* = विश्वास पाटील
*७९) आहे आणि नाही* = वि. वा. शिरवाडकर
*८० ) चकवा चांदण* – एक विनोपनिषद = मारुती चितमपल्ली
*८१) शालेय परिपाठ* = धनपाल फटिंग
*८२) मराठी विश्वकोश भाग – १,२,३,१४,१५,१६* = तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी
*८३) ग्रामगीता* = राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
*८४) अभ्यासाची सोपी तंत्रे* = श्याम मराठे
*८५) यशाची गुरुकिल्ली* = श्याम मराठे
*८६) हुमान* = संगीता उत्तम धायगुडे
*८७) झटपट गुणाकाराची भारतीय तंत्रे* = श्याम मराठे
*८८) द्रुतगणित वेद* = श्याम मराठे
*८९) तोत्तोचान* = तेत्सुको कुरोयानागी
*९०) शिक्षक असावा तर …?* = गिजुभाई
*९१) एका माळेचे मणी ( गणित )* = नागेश शंकर मोने
*९२) दिनदर्शिके मधील जादू* = नागेश शंकर मोने
*९३) ऋणसंख्या* = नागेश शंकर माने
*९४) गणित छःन्द भाग -२* = वा. के. वाड
*९५) गणित गुणगान* = नागेश शंकर मोने
*९६) मण्यांची जादू* = लक्ष्मण शंकर गोगावले
*९७) मनोरंजक शुन्य* = श्याम मराठे
*९८) उत्तरातून प्रश्ननिर्मिती* = नागेश शंकर मोने
*९९) क्षेत्रफळ आणि घनफळ* = डॉ. रवींद्र बापट
*१००) संख्यांचे गहिरे रंग* = प्रा. मोहन आपटे...

No comments:

Post a Comment

मंगळवार, ५ सप्टेंबर, २०२३

गावातील विकासाची काम

 

आपल्या गंगाधरी गावातील विकासाची काही कामं
१) खंडेराव महाराज डोंगरावर जेष्ठ नागरिकांना  फिरण्यासाठी ट्रॅक .
२) खंडेराव महाराज डोंगरावर लहान मुलांना खेळण्यासाठी ओपन जीम.
३) दत्तवाडी गंगाधरी येथील डोंगरावर मुलांना खेळण्यासाठी क्रीडांगण व धावण्यासाठी ट्रॅक
४)  खंडेराव महाराज डोंगरावर अभ्यासिका .
५) ग्रामपंचायतच्या दिर्घकालीन उत्पन्नासाठी गावातील डोंगरावर किमान ५०० चिंचेच्या  झाडांचे वृक्षारोपण व वृक्षसंवर्धंन .
६)  स्वयंरोजगारासाठी गाळे बांधकाम.
७) गावातील अंतर्गत रस्ते क्रॉंक्रिटीकरण  व डांबरीकरण.
८) गावात अंतर्गत अंडरग्राउंड गटार बांधकाम.
९) गावातील आपत्कालीन पाणी व्यवस्थापनासाठी गावात एक सामुदायिक विहिर. 
१०) गावातील सर्व वाड्या वस्त्यांवर पाईपलाईन.
११) खैरनार वस्ती येथे अभ्यासिका.
१२) खैरनारवस्ती येथे लहान मुलांसाठी ओपन जीम.
१३) जेजुरकरवस्ती येथे लहान मुलांसाठी ओपन जीम.
१४) गावात मोकळ्या जागेत जल शोषक खड्डे .
१५) गावातील सर्व वाड्या वस्त्यांवर अंगणवाडी केंद्र सुरू करणे.
१६) गावातील विविध नगरमधील ओपन स्पेस विकसित करणे.
१७) गावातील हातपंपाच्या फाउंडेशनची उंची वाढवून  पाणी जिरवण्यासाठी खड्डे .
१८) गावात रस्त्याच्या कडेला वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन.
१९) गावातील वस्त्यांवर ग्रामपंचायतचे सुचना फलक .
२०) गावात मुख्य प्रवेशद्वारावर कमान...

२१) गावातील नद्यांवर छोटे सिमेंट बंधारे व दगडी बंधारे

२२) गावातील सर्व शाळांना संगणक. 

२३) धोबीघाट

२४) दशक्रिया विधी घाट

२५) स्मशानभूमीत  लाईट व रस्त्याने लाईट 

२६) विसाव्याचा ओटा 

२७) गावातील डोंगरावर जल शोषक खड्डे 

२८)  संगणक लॅब ...


  

.   . .... संकलन .....
श्री. गोरख जाधव  गंगाधरी

मंगळवार, २३ मे, २०२३

*वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे


 🙏एकदा सर्वांनी अवश्य वाचा 


भविष्यात शेती करायची असेल तर यावर्षी शेतात प्रती एकर कमीत कमी २० झाडे लावा.अन्यथा हवामान बदलामुळे शेती बरबाद होईल.


🌳 एक झाड 50 वर्षांत 35 लाख रूपये किंमतीचे वायु प्रदूषण टाळते.

🌳 एक झाड 15 लाख रुपये किंमतीचे ऑक्सिजन उत्पादन करते.

🌳 एक झाड 40 लाख रूपये किंमतीचे पाण्याचे रीसाइक्लिंग करते.

🌳 एक झाड 1 वर्षांत 3 किलो कार्बनडाय ऑक्साईडचा नाश करते.

🌳 एक परिपूर्ण झाड 1000 हजार माणसांचे जेवण शिजवण्यासाठी उपयोगी येते.

🌳 एक झाड आसपासच्या परिसरातील तापमान 2*अंशाने कमी करते.

🌳 एक झाड 12 विद्यार्थ्यांना वह्या व पुस्तके तयार करण्यासाठी उपयोगी पडते.

🌳 एका झाडापासून कुटूंबा साठी लाकडी सामान तयार होते.

🌳 एका झाडावर 100 पक्षी घरटे बांधून राहू शकतात व त्याच्यावर त्यांच्या 25 पिढ्या जन्माला येतात आणि मधमाश्यांचे पोळे झाडावर असल्यास तीच संख्या लाखावर जाते.

🌳 एक झाड 18 लाख रूपये किंमतीचे जमिनीची धूप थांबवते.

🌳 एक झाड माणसाला लहानपणीच्या पांगुळगाड्या पासुन ते आराम खुर्ची पर्यंत तसेच वार्धक्यातील हातातील काठी पासुन स्मशानातील लाकडा पर्यंत साथ देते.

🌳 एक झाड आपल्या पालापाचोळयाची भर टाकून जमिनीची कस वाढवते.

🌳 एक झाड फळ,फुल,बिया आपल्या साठी देते.

🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳

एक झाड 50 वर्षांत काय करत आणि आपण माणसं काय करतो याचा लेखाजोखा आम्ही मुद्दामच मांडत आहोत जेणे करून प्रत्येक माणुस ह्याचा विचार करेल.

🌳 आता नाही तर कधीच नाही.

🌳 तुमची आमची मुले पाठीला ऑक्सिजनचा सिलेंडर लाऊन फिरताना कशी दिसतील विचार करा.😨

🌳 जगातील सर्व पैसा जरी एकत्र केला तरी आपण 6 महिने पुरेल येवढा ऑक्सिजन आपण तयार करू शकत नाही.

🌳 मग मित्रांनो तुम्ही आम्हाला एक सांगा कि असं कुठलं स्त्रोत्र तुमच्या कडे आहे ज्या माध्यमातून आपण आपल्याला लागणारा ऑक्सिजन तयार करू शकतो.

🌳 तासभर ऑक्सिजन विकत देणा-या डाँक्टरांना आपण देव मानतो पण आयुष्यभर फुकट आँक्सिजन देणाऱ्या झाडांची मात्र कत्तल करतो.😞

🌳 म्हणून तर मित्रांनो संत परंपरा आपल्याला सांगुन गेली.

।। *वृक्ष वल्ली आम्हा सोयरे* *वनचरे* ।।

🌳 *" निसर्ग मित्र व्हा "*

🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴

शनिवार, १८ मार्च, २०२३

नदीष्ट

नदीष्ट ही कादंबरी श्री.मनोज बोरगावकर लिखित नदी च्या परिसरातील अनुभव व आठवणीचे वर्णन असलेली कादंबरी अवश्य वाचावी. 
https://youtube.com/watch?v=WGxMeY81mF4&feature=shares

मंगळवार, २८ जुलै, २०२०

सामाजिक व भावनिक आरोग्य


यावर्षीच्या प्रथम शिक्षण परिषदेत मी गोरख जाधव आपले  सहर्ष स्वागत करतो. सर्वांना राम राम

माझा विषय आहे....
सामाजिक व भावनिक आरोग्य


समाज ही माणूस घडविणारी शाळाच आहे.
आणि आज ही शाळा काहीशी मोडकळीस आलेली आहे.  याशाळेतील विद्यार्थी असणारे तुम्ही आम्ही कोरोना या आजारामुळे एकमेकांपासुन दुरावलो आहोत. या दुरावल्यामुळे समाजात एकमेकाविषयी संशयाचे वातावरण निर्माण झाले. आज आपण कोविड मुळे जरी शरीराने अंतरावर असलो तरी आपण मनाने एकमेकांना आधार  द्यायचा आहे.उभारी द्यायची आहे. आपल्यात वाढलेल्या  सामाजिक अंतराच्या भिंती आपण विविध संपर्क माध्यमाच्या (मोबाईल, इंटरनेट ) माध्यमातून तोडु यात आणि संकटात सापडलेले प्रत्येक माणसाला यातुन बाहेर पडण्यासाठी वेगवेगळे प्रकारचे प्रयत्न रुपी सहकार्य
करु यात . ज्यामुळे आपल्या समाजाचे सामाजिक व भावनिक आरोग्य निकोप होईल आणि आजच्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी मदत होईल. यासाठी आपण गरजु नागरीकांना दैनंदिन जीवनात उपयोगी पडतील अशा वस्तुंची मदत करु या.तसेच एक व्यक्ती म्हणून आपल्याला जे ज्ञान अवगत असेल , एखादी कला येत असेल तर यातुन  समाजाचे , विद्यार्थ्यांचे मनोरंजन  , प्रबोधन , शिक्षण,  आरोग्य सुदृढ होईल असे सादरीकरण करुन संकटात सापडलेल्या समाजाला उभारी देऊ यात.
आज खरेतर समाजाचे भावनिक आरोग्य कोरोनामुळे धोक्यात आले आहे. माणूस जर आजाराला बळी पडत असेल तर याला आपले मानसिक आरोग्य ही कारणीभूत आहे...समर्थ रामदास स्वामी म्हणतात ....मन करा रे प्रसन्न सर्व सिध्दीचे कारण.... आणि म्हणूनच विद्यार्थ्यांचे , समाजाचे भावनिक आरोग्य जपण्यासाठी एक शिक्षक म्हणून आपली जबाबदारी महत्वपूर्ण आहे.कारण एखादी व्यक्ती किंवा कुटुंब जर याआजाराला बळी पडले तर समाज त्या कुटुंबापासुन दुरावतो.असे करणे टाळावे याउलट स्वतःची काळजी घेऊन त्याकुटुंबाला शक्य ती मदत करायला पाहिजे. असं म्हटले जाते .माणसाचे मन खंबीर असेल तर त्या व्यक्तीचा पराभव कोणी करु शकत नाही. जय किंवा पराजय हा पहिले मनात होतो.मनाने खचलेला माणुस विजयी होऊ शकत नाही. म्हणून माणसाच्या मनाला खंबीर करणारे काम आपल्याला करायचे आहे. कोरोनाला घाबरायचे नाही तर हरवायचे आहे. म्हणून याठिकाणी मला म्हणावेसे वाटते..." जिंकू किंवा मरु माणुसकीच्या शत्रू संगे युध्द आमचे सुरू "
आपल्याला खरे तर कोरोना रुपी शुत्रु बरोबर लढायचे आहे. समाजाची ही घडी परत बसवायची आहे.

याक्षणी एक सुविचार आठवतो. ....हसा खेळा पण शिस्त पाळा.....
आज आपल्याला यासुविचाराचे तंतोतंत पालन करुन समाजाचे भावनिक आरोग्य उंचावत जगायचे आहे. म्हणजेच कायतर ......आपल्या आज जगायचे आहे पण शिस्त पाळत ..आपल्या
 आचरणामुळे समाजाचे अहित होईल असे आचरण आपल्याला टाळायचे आहे..कोरोना या संकटाकडे संकट म्हणून न बघता एक संधी म्हणून पहायचे आहे....मला आजचा विषय मांडण्या साठी मा.गटशिक्षणाधिकारी श्रीमती ठोके मॅडम  , केंद्र प्रमुख मा.श्री.पवार  सर यांनी जी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचे  मनःपूर्वक आभार.....🙏
शेवटची विनंती कोणाला वृक्षारोपणासाठी रोपं  पाहिजे असल्यास मिळतील...

🌱 गोरख जाधव 🌱
      उपशिक्षक
 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा
 तळेवस्ती गंगाधरी
ता. नांदगाव जि. नाशिक 

मंगळवार, ९ जून, २०२०

नैसर्गिक रित्या वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन



सन 2019 च्या पावसाळ्यात बीज रोपण केलेल्या बियांच्या  झाडांना दिवाळी नंतर हिवाळ्यात व उन्हाळ्यात भर लावली होती .उन्हाळ्यात ही झाडं जमीनीवर सुकुन गेली होती यावर्षी जुन 2020 चा पहिला पाऊस पडल्यावर आज संध्याकाळी यापरिसराला भेट दिली. ही जमीनीत असलेली झाडं वर आली....नैसर्गिक पध्दतीने एक थेंब पाणी न टाकता फक्त मागच्या पावसाळ्यात लावलेली ही झाडं या पावसाळ्यापर्यंत जिवंत राहिली....तीही डोंगरावर...मुरमाड , खडकाळ जमीनीत..... मागील काही वर्षापासून आम्ही हा प्रयोग करत आहोत.....

  🌱🍀संकल्पना 🍀🌱

 🌱 गोरख जाधव  🌱
         गंगाधरी
 🌱 ता.नांदगाव जि. नाशिक  🌱
          🌱🌱🌱🌱
7387476810

गुरुवार, ७ मे, २०२०

हुशार ...खरंच कोण...सगळेच जण....

सौजन्य- सा. सकाळ

आपण म्हणतो हा हुशार नाही .पण आपण आपला हा दृष्टीकोन बदलला पाहिजे. जगात प्रत्येक जण हुशारच असतो.फक्त प्रत्येकाची हुशारीच क्षेत्र वेगळे असते.त्यामुळे जगातील कोणत्याही व्यक्तीला कमी हुशार समजु नये.हुशारी समजून घेण्यासाठी  वाचा साप्ताहिक सकाळ मधील हा लेख..... किती गं बाई मी हुशार..


शुक्रवार, २० मार्च, २०२०

सोमवार, ६ जानेवारी, २०२०




एक भेट....जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवाळी ता. त्र्यंबक जि.नाशिक ही शाळा वर्षभर सुरु असते. याशाळेतील विद्यार्थी व शिक्षक यांना सलाम........