पृष्ठे

पृष्ठे

मंगळवार, २८ जुलै, २०२०

सामाजिक व भावनिक आरोग्य


यावर्षीच्या प्रथम शिक्षण परिषदेत मी गोरख जाधव आपले  सहर्ष स्वागत करतो. सर्वांना राम राम

माझा विषय आहे....
सामाजिक व भावनिक आरोग्य


समाज ही माणूस घडविणारी शाळाच आहे.
आणि आज ही शाळा काहीशी मोडकळीस आलेली आहे.  याशाळेतील विद्यार्थी असणारे तुम्ही आम्ही कोरोना या आजारामुळे एकमेकांपासुन दुरावलो आहोत. या दुरावल्यामुळे समाजात एकमेकाविषयी संशयाचे वातावरण निर्माण झाले. आज आपण कोविड मुळे जरी शरीराने अंतरावर असलो तरी आपण मनाने एकमेकांना आधार  द्यायचा आहे.उभारी द्यायची आहे. आपल्यात वाढलेल्या  सामाजिक अंतराच्या भिंती आपण विविध संपर्क माध्यमाच्या (मोबाईल, इंटरनेट ) माध्यमातून तोडु यात आणि संकटात सापडलेले प्रत्येक माणसाला यातुन बाहेर पडण्यासाठी वेगवेगळे प्रकारचे प्रयत्न रुपी सहकार्य
करु यात . ज्यामुळे आपल्या समाजाचे सामाजिक व भावनिक आरोग्य निकोप होईल आणि आजच्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी मदत होईल. यासाठी आपण गरजु नागरीकांना दैनंदिन जीवनात उपयोगी पडतील अशा वस्तुंची मदत करु या.तसेच एक व्यक्ती म्हणून आपल्याला जे ज्ञान अवगत असेल , एखादी कला येत असेल तर यातुन  समाजाचे , विद्यार्थ्यांचे मनोरंजन  , प्रबोधन , शिक्षण,  आरोग्य सुदृढ होईल असे सादरीकरण करुन संकटात सापडलेल्या समाजाला उभारी देऊ यात.
आज खरेतर समाजाचे भावनिक आरोग्य कोरोनामुळे धोक्यात आले आहे. माणूस जर आजाराला बळी पडत असेल तर याला आपले मानसिक आरोग्य ही कारणीभूत आहे...समर्थ रामदास स्वामी म्हणतात ....मन करा रे प्रसन्न सर्व सिध्दीचे कारण.... आणि म्हणूनच विद्यार्थ्यांचे , समाजाचे भावनिक आरोग्य जपण्यासाठी एक शिक्षक म्हणून आपली जबाबदारी महत्वपूर्ण आहे.कारण एखादी व्यक्ती किंवा कुटुंब जर याआजाराला बळी पडले तर समाज त्या कुटुंबापासुन दुरावतो.असे करणे टाळावे याउलट स्वतःची काळजी घेऊन त्याकुटुंबाला शक्य ती मदत करायला पाहिजे. असं म्हटले जाते .माणसाचे मन खंबीर असेल तर त्या व्यक्तीचा पराभव कोणी करु शकत नाही. जय किंवा पराजय हा पहिले मनात होतो.मनाने खचलेला माणुस विजयी होऊ शकत नाही. म्हणून माणसाच्या मनाला खंबीर करणारे काम आपल्याला करायचे आहे. कोरोनाला घाबरायचे नाही तर हरवायचे आहे. म्हणून याठिकाणी मला म्हणावेसे वाटते..." जिंकू किंवा मरु माणुसकीच्या शत्रू संगे युध्द आमचे सुरू "
आपल्याला खरे तर कोरोना रुपी शुत्रु बरोबर लढायचे आहे. समाजाची ही घडी परत बसवायची आहे.

याक्षणी एक सुविचार आठवतो. ....हसा खेळा पण शिस्त पाळा.....
आज आपल्याला यासुविचाराचे तंतोतंत पालन करुन समाजाचे भावनिक आरोग्य उंचावत जगायचे आहे. म्हणजेच कायतर ......आपल्या आज जगायचे आहे पण शिस्त पाळत ..आपल्या
 आचरणामुळे समाजाचे अहित होईल असे आचरण आपल्याला टाळायचे आहे..कोरोना या संकटाकडे संकट म्हणून न बघता एक संधी म्हणून पहायचे आहे....मला आजचा विषय मांडण्या साठी मा.गटशिक्षणाधिकारी श्रीमती ठोके मॅडम  , केंद्र प्रमुख मा.श्री.पवार  सर यांनी जी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचे  मनःपूर्वक आभार.....🙏
शेवटची विनंती कोणाला वृक्षारोपणासाठी रोपं  पाहिजे असल्यास मिळतील...

🌱 गोरख जाधव 🌱
      उपशिक्षक
 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा
 तळेवस्ती गंगाधरी
ता. नांदगाव जि. नाशिक 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा