ATM या शैक्षणिक ग्रुपचे शैक्षणिक संमेलन १५ व १६ मे २०१७ रोजी कोकमठाण ता. कोपरगाव जि नगर येथे संपन्न ...
कार्यक्रर्माचे उद्घाटन......Ncert दिल्ली कला विभाग प्रमुख आदरणीय पवन सुधीर मॅडम, आदरणीय भाषा अभ्यासक रेणुताई दांडेकर, लातूर पंचायत समिती गट शिक्षण अधिकारी मा. तुप्तीताई अंधारे, आत्मा मलिकचे व्यवस्थापक श्री. हिरामण कोल्हे आदी मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाले.हे संमेलन म्हणजे शिक्षकांनी शिक्षण आणि शिक्षक समृध्द करण्यासाठी कार्यप्रेरणा देणारी एक समृध्द भरारीच....... मी तर म्हणेल शिक्षण व्यवस्था समृध्द करण्यासाठी उचलेले एक धाडशी पाऊलच. अप्रतिम असा उद्घाटन सोहळा शिक्षकांमधील प्रतिभेला वाव देणारच होता. उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन उत्साही होते. स्वरचित गीताने केलेले स्वागत प्रतिभा संपन्नच होते.
पहिले सत्र -
आदरणीय रेणुताई दांडेकर मॅडमांनी आपल्या ओघवत्या भाषा शैलीने शिक्षकांशी संवाद साधला.ताईंनी शिक्षकांशी थेट संवाद साधत भाषा शिक्षणातील विविध मुद्यांवर चर्चा केली व शिक्षकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. भाषा शिक्षणातील विविध पैलू समजून सांगितले.भाषा शिक्षणातील प्रयोगाचे महत्व पटवून दिले.
...............................................................................................................................................
दुसरे सत्र -
आदरणीय पवन सुधीर मॅडम कला विभाग प्रमुख Ncert दिल्ली
कलेच्या मध्यमातून शिक्षण प्रक्रिया कशी समृध्द होते. हे पटवून दिले. कला ही मेंदूची व्यायाम शाळा आहे. कलेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कृतीशील करून शिक्षण आनंदायी , प्रेरणादायी करू शकतो. आपले विद्यार्थी १२ मिनिट एखाद्या घटकावर स्थिर असतात. विद्यार्थ्यांना Active ठेवण्यासाठी १२ मिनिटानंतर एखादी Activity घेणे गरजेची असल्याचे पटवून दिले.
....................................................................................................................................................
तिसरे सत्र - कविता वाचन
स्मिताताई गालफाडे
ताईंनी आपल्या मंजुळ व सुमधुर आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध केले. तसेच कवितांना विविध चाली लावत भाषा शिक्षणातील कवितेचे महत्व अधोरेखित केले.
चौथे सत्र
भरत पाटील सर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळीनगर मालेगाव यांच्या शाळेतील विद्यार्थींनी निशा रौंदळचा निशिगंध काव्यसंग्रहाबद्द्ल, MY DREAM या इंग्रजी काव्यसंग्रहाबद्द्ल विद्यार्थी हर्षल रौंदळ व शैक्षणिक अॅप निर्मितीबद्दल मानसी बागुल यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
.....................................................................................................................................................
पाचवे सत्र
ग्रेट भेट
माननीय तृप्तीताई अंधारे
गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती लातूर
ताईंची प्रकट मुलाखत प्रेरणादायीच होती. एक शिक्षक ते गटशिक्षण अधिकारी असा प्रवास त्यांनी मनोरंजक शैलीत मांडला.ताईंनी लातूर येथील शिक्षण विभागात राबवीत असलेले उपक्रम सांगितले .
..........................................................................................................................................................
असा शैक्षणिक संमेलनाचा प्रथम दिन संपन्न झाला. मला संमेलनाच्या पहिल्या दिवशीच उपस्थित राहता आले. असे संमेलन दरवर्षी व्हायला हवेत. हे संमेलन महाराष्ट्रातील कृतीशील शिक्षकांच्या वतीने स्वयंप्रेरणेने , स्वतः च्या खर्चाने आयोजित केले होते.या संमेलनामुळे आपला महाराष्ट्र शैक्षणिक दृष्टीने प्रगत व समृध्दच होईल. आज शिक्षण व्यवस्थेत अशा कृतीशील शिक्षकांची गरज आहे. संमेलनात सर्व सदस्य कोणी मोठा नाही कि छोटा आपल्या वाट्याला आलेले काम चोख पद्धतीने पार पाडत होते. मला एक दिवस तरी संमेलनाला उपस्थित राहता आले व अनेक शिक्षणप्रेमी, शैक्षणिक वारीचे वारकरी, उपक्रमशील, कृतीशील, सकारात्मक उर्जेचे पाईक , सृजनशील , तंत्रस्नेही, शैक्षणिक कर्मयोगी, प्रेरणादायी अशा शिक्षक मित्रांना भेटता आले. हे मी माझे भाग्यच समजतो. या संमेलनाच्या माध्यमातून आपण ज्ञानरुपी अमृत आम्हाला उपलब्ध करून दिले. अशा सर्व प्रेरणादायी ATM ग्रुपच्या कर्मयोगी शिक्षक मित्रांना माझा कोटी कोटी सलाम......
खुप छान गोरख सर 😊
उत्तर द्याहटवाखूप छान सर...
उत्तर द्याहटवामस्त..
धन्यवाद सर
हटवा