मी बुधवार नंतर काल शनिवारी शाळेत गेलो होतो. हा आमच्या शाळेचा विद्यार्थी निशांत कर्नर.... मी शाळेत जाण्याअगोदर निशांतने नळ चालू करून काही झाडांना पाणी दिले होते. निशांतने झाडांना पाणी देण्याचे केलेले काम पाहुन ऊर भरून आले. विद्यार्थ्यांमध्ये आम्ही शाळेविषयी व झाडांविषयी आपुलकी निर्माण करु शकलो याचा सार्थ अभिमान वाटला. आम्ही शिक्षक शाळेविषयी व पर्यावरणाविषयी विद्यार्थ्यांमध्ये जाणिव निर्माण करून एक देश सेवेसाठी जागरुक नागरिक निर्माण करण्यासाठी सचोटीने प्रयत्न केल्याचे निशांतने केलेल्या कार्यातुन दिसुन आले. व आम्ही शिक्षक शाळेत विद्यार्थी घडविण्याचे जे पवित्र कार्य करत आहोत. ते करण्यासाठी अजून प्रेरणा मिळाली. मी सुट्टीत जेव्हा जेव्हा शाळेत जातो तेव्हा तेव्हा निशांत कर्नर, ईश्वर ठोंबरे, ऋषिकेश कर्नर , तुषार ठोंबरे, भास्कर ठोंबरे आदी विद्यार्थी झाडांना पाणी देण्यासाठी धावुन येतात व पाणी टाकु लागतात. आमच्या या बालगोपाळांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. तसेच यानिमित्तांने नुकतेच भेटलेले द्विभाषीक पुस्तकातील काही पुस्तक या विद्यार्थ्यांनी वाचून काढली........जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळेवस्ती गंगाधरी ता.नांदगाव जि.नाशिक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा